भजनी मालिका
← भजनांकडे परत

वेद प्रमाण करावया गोकुळासि आला । कीं नाटळिचा कुवांसा जाला

ved praman karavaya gokulasi ala | kin natalicha kuvansa jala

वेद प्रमाण करावया गोकुळासि आला । कीं नाटळिचा कुवांसा जाला । ब्रह्म आणि गोवळा । ब्रह्मादिका वंद्यु ऐसा निगमु । पैं लाजविला ॥ गणिका स्वीकारि राहो मांडला । कीं दशरथ पतनीं चुकविला । एका तें म्हणे जागा । एका तें म्हणेरे निजा । तैं मुचूकुंदापें काळयवनु आणिला रया ॥१॥ विरोचनसुत । बळी बांधोनि जेणें । निगड निबध्द गजा सोडविलें । एकाचीं बालकें काळापासूनियां हिरे । एका बाळाचे बाप विदारिले । शिशुपाळा जैत देऊनियां शेखिं पाहेपां आपणचि जिंकीलें रया ॥ध्रु०॥ गुरुदुर्वास याचिये भक्ति आणि त्याचियेची रथीं देविरुक्मिणीसहित खांदु चालविला । तो तेणें मानें फ़ुंदो पाहे तंव कोलतिया भेणें त्रैलोक्य हिंडविला । पैजा सारुनि हातीं सुदर्शन वसविलें कीं भीष्मपण । साचू केला । जितुकाचि कौरवा तितुकाचि पांडवां अचोज हा अमुलारया ॥२॥ जमदग्नी जनकाचा वोल भूमीं न पडावा । हाठावो वरि पितृभक्तीची आवडी । जेणें साचपणा कारणें माता वधिली । कीं पुराणें खोचिलीं तोंडीं ॥ असुरदैत्य संहारितां बापु तयांची पातकें दवडी । प्रजासि रायाची आण रायासी कवण नेमु हे तों संततपणाची प्रौढी रया ॥३॥ या परि चराचरींचे दानव गिंवसूनि पुसिले परोपरी । तंव यादवांसि अंबुलेपणची आस जाली थोरी । प्रभास क्षेत्रीं अवघियातें केली एकसरी । देवकी पुतना नोळखिजे । वैर भक्तीसी एकिची वोवरी । पवनु काय हा पंथु शोधूनियां चाले समर्थु करिल तें उजरि रया ॥४॥ या गोविंदाची माव । हे तों ब्रह्मदिकांसी कुवाडें । तो हा मायेचेनि साचपणें न घेपवे । प्रकृतीचे गुण ते याचिये गांवीचे । तो करील तें अनुचित बरवें ॥ लाघावियाचे भ्रमु लाघवीच जाणे यांसि कांही नवल नव्हे । बाप रखुमादेविवरु जाणीतला तरि उकलेल आघवें रया ॥५॥