भजनी मालिका
← भजनांकडे परत

वायां खेळ एकीबेकी । पडलीस काळाचे मुखीं

vayan khel ekibeki | padalis kalache mukhin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वायां खेळ एकीबेकी । पडलीस काळाचे मुखीं ॥१॥ आधींच एक निर्गुण रे । मायेनें केलें सगुण रे ॥२॥ एकीबेकी म्हणतां एकलें रे । दोन म्हणतां सर्व आतलें रे ॥३॥ एका जनार्दनीं ऐकलें रे । एक जण अवघें फिटलें रे ॥४॥