भजनी मालिका
← भजनांकडे परत

वाउग्या खटपटा । नावडती तैशा चेष्टा

vaugya khatapata | navadati taisha cheshta

रचनाकार: संत निळोबा · अभंग
वाउग्या खटपटा । नावडती तैशा चेष्टा ॥१॥ जेणें पांवे भ्रंश बुध्दी । न पावती स्वरुपसिध्दि ॥२॥ घालिती घालणी । काय करुं ते बोलणीं ॥३॥ निळा म्हणे मिथ्यावाद । काय करावे ते छंद ॥४॥