भजनी मालिका
← भजनांकडे परत

वाउगे बोल जाती वायां । पंढरीराया कृपेविण

vauge bol jati vayan | pandhariraya krupevin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वाउगे बोल जाती वायां । पंढरीराया कृपेविण ॥१॥ तुमचा छंद वसो मनीं । संतचरणीं वास सदा ॥२॥ नको आत्मस्थिति वायां शीण । तुम्हांवीण दयाळा ॥३॥ एका जनार्दनीं शरण । मनाचें मोहन तुम्ही माझें ॥४॥