भजनी मालिका
← भजनांकडे परत

वाउगाची सोस वाहताती वोझें । म्हणती माझें माझें हीन भाग्य

vaugachi sos vahatati vojhen | mhanati majhen majhen hin bhagya

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वाउगाची सोस वाहताती वोझें । म्हणती माझें माझें हीन भाग्य ॥१॥ जाणती नेणती राहाटी देखती । मरती रडती देखती त्या ॥२॥ एका जनार्दनीं भुलले ते वायां । परि देवराया शरण न जाती ॥३॥