भजनी मालिका
← भजनांकडे परत

वाउगाचि सोस न करी सायास । भजे श्रीसंतांस एकभावें

vaugachi sos na kari sayas | bhaje shrisantans ekabhaven

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वाउगाचि सोस न करी सायास । भजे श्रीसंतांस एकभावें ॥१॥ जाणोनि नेणतां कां होसीं रे मुर्ख । सुखांचे निजमुख विटेवरी ॥२॥ एका जनार्दनीं धरुनि विश्वास । होई कां रे दास संतचरणीं ॥३॥