भजनी मालिका
← भजनांकडे परत

वाउगाचि शीण करिसी सर्वथा । चुकसी परमार्था मूढा जाण

vaugachi shin karisi sarvatha | chukasi paramartha mudha jan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वाउगाचि शीण करिसी सर्वथा । चुकसी परमार्था मूढा जाण ॥१॥ किती करिसी सोस माझें माझें म्हणोनि । शेवटीं बंधनीं पडसी मूढा ॥२॥ अंतकाळीं कोणी नाही रे सांगाती । होईल फजिती तुझी तुला ॥३॥ एका जनार्दनीं वाउगाचि धंदा । त्यजुनी गोविंदा सेवी बापा ॥४॥