भजनी मालिका
← भजनांकडे परत

वसवूनियां चराचर । उभा नागर विटेवरी

vasavuniyan charachar | ubha nagar vitevari

रचनाकार: संत निळोबा · अभंग
वसवूनियां चराचर । उभा नागर विटेवरी ॥१॥ सगुण रुपें भासे लोकां । परि हा नेटका निरामय ॥२॥ दैत्यांतकचि म्हणती यासी । परि हा सकळांसी भक्षक ॥३॥ भक्तांपाशी गुंतला दिसे । परि हा वसे अणुरेणीं ॥४॥ कर्ता भोक्ता वाटे सकळां । परि हा वेगळा अलिप्त ॥५॥ निळा म्हणे नयेचि मना । करितां विवंचना श्रुतिशास्त्रांसिही ॥६॥