भजनी मालिका
← भजनांकडे परत

वर्षाचा दिन आनंद झाला

varshacha din anand jhala

रचनाकार: संत बोधले · अभंग
वर्षाचा दिन आनंद झाला । आनंदाचे सुख संतमेळा मिळाला ॥१॥ वर्षाचा सण आम्हा नित्य दिवाळी । भावे भक्त ओवाळी साधुसंत ॥२॥ सेवा मुख आम्हा नित्य ते भोजनी । आम्ही तुष्ट मनी जेविता सदा ॥३॥ बोधला म्हणे आम्हा जाहला निरोप । पंढरपूरी आहे आमुचा मायबाप ॥४॥