भजनी मालिका
← भजनांकडे परत

वरीवरी दाविती आचार । अंतरीं तो अनाचार

varivari daviti achar | antarin to anachar

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वरीवरी दाविती आचार । अंतरीं तो अनाचार ॥१॥ मुखीं नाहीं कधीं नाम । सदा काम विषयाचा ॥२॥ नेणें कधीं संतसेवा । न करी देवा पूजन ॥३॥ शरण एका जनार्दनीं । ऐसा जन्मला तो जनीं ॥४॥