भजनी मालिका
← भजनांकडे परत

वरिले उपरि उभे राहुन हरि

varile upari ubhe rahun hari

रचनाकार: संत बोधले · अभंग
वरिले उपरि उभे राहुन हरि । वेणु वाजवी नाना परि रे कान्हया ॥१॥ पवयाचा नाद गोपिंकाचे कानी । तयामाजी धन्य रखमाई रे कान्हया ॥ २॥ प्रती आगळी तरीच जवळी । करी धरिली गोपाळी रे कान्हया ॥३॥ भावार्थ मोठा तरीच वाटा । अर्धांगी शोभे रखमाई रे कान्हया ॥४॥ सकळा मिळोनि प्रीतिया लाविती । रखुमाईचा पती रे कान्हया ॥५॥ अवघी मिळेनी बेदाद झाला । रखुमाईने अंती नेला रे कान्हया ॥६॥ साही आती अठरा चारी ह्या भांडती । न कळे तयाची कोण गती रे कान्हा ॥७॥ बोधला म्हणे रखुमाई । कृपाळु जाली आम्हा पाही रे कान्हया ॥८॥