भजनी मालिका
← भजनांकडे परत

वरी बुकीयाचे धूसर । अत्तर कस्तुरी केशर

vari bukiyache dhusar | attar kasturi keshar

रचनाकार: संत निळोबा · अभंग
वरी बुकीयाचे धूसर । अत्तर कस्तुरी केशर ॥१॥ तुळशी नाना सुमनमाळा । दिव्यसंबराचा सोहळा ॥२॥ पांडुरंगा ओंवाळिती । नारीनर अवलोकिती ॥३॥ निळा म्हणे दिपावळी । सोडिती चंद्रभागाजळीं ॥४॥