भजनी मालिका
← भजनांकडे परत

वर्‍हाड न होतां होतें खेळेमेळे

var‍had na hotan hoten khelemele

वर्‍हाड न होतां होतें खेळेमेळे । लग्न लागलें कवणें दृष्ट वेळे ॥ तेथुनि अंबुला चालवितो मातें । कैसेनि येथें निस्तरावें ॥१॥ मौनेंचि घरवात करावियाची । चाड नाहीं मज या जिवाचीगे माये ॥२॥ आया बायांनो ऐका वो न्यावो । येकांतीं सदा वसताहे नाहो । अंगभोग नाहीं ऐसा दुरावो । गुरुवार होतसे हाचि नवलावो ॥३॥ एखादे वेळे मजचि मरितोसी । लाजा मी सांगो कोण्हापासी ॥ राग आलिया आवघेया ग्रासी । ऐसी अति प्रीति आम्हां दोघांसी ॥४॥ म्हातारा आमुला काय माये । रुप ना वर्ण हात ना पाये ॥ तरुणि आपुलें मी रुप न साहे । क्षणभरि या वेगळी न राहे ॥५॥ पिसुणा देखतां बुझाविलें माये । बुझवणी माझी शब्द न साहे ॥ बापरखुमादेविवरु विठ्ठल पाहे । पाहाते पाहाणें जालेंगे माये ॥६॥