भजनी मालिका
← भजनांकडे परत

वाराणशी यात्रे जाईन । प्रयाग तीर्थ पाहीन

varanashi yatre jain | prayag tirtha pahin

वाराणशी यात्रे जाईन । प्रयाग तीर्थ पाहीन । त्रिवेणिये स्नान करीन । परि मी वीट नव्हेन ॥१॥ विठोबा पाईची वीट । मी कईबा होईन ॥ध्रु०॥ गोदावरी यात्रे जाईन । बारा वरुषाचें फळ लाहीन । अब्जकतीर्थी स्नान करीन । परि मी वीट नव्हेन ॥२॥ मल्लिकार्जुन यात्रे जाईन । श्रीशैल्यशिखर पाहीन । पाताळगंगें स्नान करीन । परि मी वीट नव्हेन ॥३॥ मातापुर यात्रे जाईन । सह्याद्री पर्वत पाहीन । गहनगंगेम स्नान करीन । परी मी वीट नव्हेन ॥४॥ कोल्हापुरीं यात्रे जाईन । महालक्ष्मी पाहीन । विशाळतीर्थी स्नान करीन । परि मी वीट नव्हेन ॥५॥ एका अंगुष्ठीं तप करीन । पृथ्वीपात्रचि लाहीन । देह कर्वतीं देईन । परि मी वीट नव्हेन ॥६॥ बहुता पुण्यांच्या सायासीं । चरण जोडले विटेसी । निवृत्ति दासु म्हणे परियेसी ॥ परी मी वीट नव्हेन ॥७॥