भजनी मालिका
← भजनांकडे परत

वाजतसे बोंब कोण्ही नायकती कानीं । हरि हरि न म्हणती तयांसी थोर जाली हानी

vajatase bomb konhi nayakati kanin | hari hari na mhanati tayansi thor jali hani

वाजतसे बोंब कोण्ही नायकती कानीं । हरि हरि न म्हणती तयांसी थोर जाली हानी ॥१॥ उठा उठा जागा पाठीं भय आलें मोठें । पंढरिवांचुनी दुजा ठाव नाहीं कोठें ॥ध्रु०॥ तापत्रयाग्नीचा लागला वोणवा । कवण रिघे आड कवण करी सावाधावा ॥२॥ देखोनि ऐकोनि एक बहिर अंध जाले । विषयाचे लंपट बांधोनि यमपुरीस नेले ॥३॥ आजा मेला पणजा मेला बाप मसणा नेला । देखत देखत नातु पणतु तोही वेडा जाला ॥४॥ व्याघ्र लासी भूतें हीं लागताती पाठीं । हरिभजन न करितां सगळें घालूं पाहे पोटीं ॥५॥ संतसंग धरा तुम्ही हरिभजन करा । पाठीं लागलासे काळ दांत खातो करकरां ॥६॥ बापरखुमादेविवरा विठ्ठला शरण । भावे न निघतां न चुके जन्ममरण ॥७॥