भजनी मालिका
← भजनांकडे परत

वैकुठींचा हरी गोपवेष धरी । घूऊनि शिदोरी जाय वनां

vaikuthincha hari gopavesh dhari | ghuuni shidori jay vanan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वैकुठींचा हरी गोपवेष धरी । घूऊनि शिदोरी जाय वनां ॥१॥ धाकुले संवगडे संगती बरवा । ठाई ठाई ठेवा गोधनांचा ॥२॥ बाळ ब्रह्माचारी वाजवी मोहरी । घेताती हुंबरी एकमेंकां ॥३॥ दहीं भात भाकरी लोणचें परोपरी । आपण श्रीहरी वाढितसे ॥४॥ श्रीहरी वाढिलें गोपाळ जेविलें । उच्छिष्ट सेविलें एका जनार्दनीं ॥५॥