भजनी मालिका
← भजनांकडे परत

वैजंयती माळ किरीट कुंडलें । रुप तें सांवळें विटेवरी

vaijanyati mal kirit kundalen | rup ten sanvalen vitevari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वैजंयती माळ किरीट कुंडलें । रुप तें सांवळें विटेवरी ॥१॥ वेधलें वो मन तयांच्या चरणीं । होताती पारणीं डोळीयांची ॥२॥ पुराणासी वाड शास्त्रासी तें गुढ । तें आम्हालागी उघड परब्रह्मा ॥३॥ ध्यानी ध्याती मुनी चिंतिती आसनीं । तोहा चक्रपाणी सुलभ आम्हां ॥४॥ सन्मुख भीवरा मध्यें पुंडलिक । एका जनार्दनीं सुख धन्य धन्य ॥५॥