भजनी मालिका
← भजनांकडे परत

वाचे सदा रामनाम । तया न बाधी क्रोध काम

vache sada ramanam | taya na badhi krodh kam

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वाचे सदा रामनाम । तया न बाधी क्रोध काम ॥१॥ हेंचि एक सत्य सार । वायां नको वेरझार ॥२॥ संसार वायां न म्हणे सार । करी परमार्थ विचार ॥३॥ एका जनार्दनीं रामनाम । वाचे वदे तुं निष्काम ॥४॥