भजनी मालिका
← भजनांकडे परत

उत्तीर्ण त्यांचे काय व्हावें । न कळे भावें वंदितों

uttirna tyanche kay vhaven | na kale bhaven vanditon

रचनाकार: संत निळोबा · अभंग
उत्तीर्ण त्यांचे काय व्हावें । न कळे भावें वंदितों ॥१॥ जीव पायीं ठेवूं म्हणे । लटिकेपणें तो मिथ्या ॥२॥ देह मांस चर्म हाडें । अर्पिता अपाडें नैश्वर तीं ॥३॥ निळा म्हणे चरणीं माथा । ठेवूं आतां संतांचिये ॥४॥