भजनी मालिका
← भजनांकडे परत

उत्तीर्ण त्याचें नव्हिजे आतां । जिवही अर्पितां थोडाची

uttirna tyachen navhije atan | jivahi arpitan thodachi

रचनाकार: संत निळोबा · अभंग
उत्तीर्ण त्याचें नव्हिजे आतां । जिवही अर्पितां थोडाची ॥१॥ ओंवाळूनि सांडूं काया । वरुनी पायां संतांच्या ॥२॥ मायबापा काय दयावें । कैसें व्हावें उताराई ॥३॥ निळा म्हणे ज्यांची कृपा । जन्म खेपा निवारी ॥४॥