भजनी मालिका
← भजनांकडे परत

उत्तम स्त्री देखोनि दृष्टी । मुर्ख कैसा लाळ घोटी

uttam stri dekhoni drushti | murkha kaisa lal ghoti

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
उत्तम स्त्री देखोनि दृष्टी । मुर्ख कैसा लाळ घोटी ॥१॥ तैसा विनटें रामनामा । तेणें चुकशी कर्माकर्मा ॥२॥ मुषक देखोनि मार्जार । तैसे उभे यम किंकर ॥३॥ मीन तळमळी जैसा । विषयीक प्राणी तैसा ॥४॥ शरण एका जनार्दनीं । दुजा छंद नाहीं मनीं ॥५॥