भजनी मालिका
← भजनांकडे परत

उत्तम संचित होतें गांठीं । तेणेंचि या भेटी संतांसवें

uttam sanchit hoten ganthin | tenenchi ya bheti santansaven

रचनाकार: संत निळोबा · अभंग
उत्तम संचित होतें गांठीं । तेणेंचि या भेटी संतांसवें ॥१॥ सुकृतासी आलीं फळें । भावबळें लगटोनी ॥२॥ त्याच्या भाग्या आले भाग्य । लाधले संग संतांचा ॥३॥ निळा म्हणे पूर्णते आले । जिहीं या सेविलें संतचरणा ॥४॥