भजनी मालिका
← भजनांकडे परत

उत्तम ने परी उभविलें मनोहर

uttam ne pari ubhavilen manohar

उत्तम ने परी उभविलें मनोहर । दीपकावीण मंदीर शोभा न पवे बापा ॥१ ॥ धृतेंवीण भोजन तांबूळेंवीण वदन । कंठेवीण गायन शोभा न पवे बापा ॥२॥ सुंदर आणि रमण जरी होय तरुणी । पुरुषावीण कामिनी शोभा न पवे बापा ॥३॥ दिधल्यावीण दाता श्रोत्यावीण वक्ता । वेदावीण पंडित शोभा न पवे बापा ॥४॥ ज्ञानेश्वर सांगे अनुभवीया अंगें । नुसता बोलें वागे शोभा न पवे बापा ॥५॥