भजनी मालिका
← भजनांकडे परत

उत्तम अधम येथें नाहीं काम । जपें तूं श्रीराम सर्वकाळ

uttam adham yethen nahin kam | japen tun shriram sarvakal

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
उत्तम अधम येथें नाहीं काम । जपें तूं श्रीराम सर्वकाळ ॥१॥ मंत्रतप कांहीं योगाची धारणा । न लगे नामस्मरणा वांचुनियां ॥२॥ योग याग तप वाउगा बोभाट । अष्टांग नेटपाट न लगें कांहीं ॥३॥ एका जनार्दनीं गावें मुखी नाम । तेणें वारे काम क्रोध सर्व ॥४॥