भजनी मालिका
← भजनांकडे परत

उठोनि एके दिनीं म्हणे यशोदा कान्हया । गोधनें घेऊनियां जाई वनासी लवलाह्मा

uthoni eke dinin mhane yashoda kanhaya | godhanen gheuniyan jai vanasi lavalahma

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
उठोनि एके दिनीं म्हणे यशोदा कान्हया । गोधनें घेऊनियां जाई वनासी लवलाह्मा ॥ सवें मिळालें चिमणे सवंगडी । शिदोरी काठी कांबळी जाळी घेती आवडी ॥२॥ एका जनार्दनी गाई सोडिल्या सार्‍या । रामकृष्ण सवंगडीया देव येती पहावया ॥३॥