भजनी मालिका
← भजनांकडे परत

उतरिला माझा भार । येणें कैवार धरुनियां

utarila majha bhar | yenen kaivar dharuniyan

रचनाकार: संत निळोबा · अभंग
उतरिला माझा भार । येणें कैवार धरुनियां ॥१॥ आपुला आपण सोहळा करी । पाहिजे संसारीं पुरवी तें ॥२॥ नेदि पडों उणें कोठें । आलीं संकटें निवारी ॥३॥ निळा म्हणे झाला ऋणी । चक्रपाणी आम्हां घरीं ॥४॥