भजनी मालिका
← भजनांकडे परत

उपवर ती कांता जाहली असे जाण । गोर्‍याची वासना नाहीं कामीं

upavar ti kanta jahali ase jan | gor‍yachi vasana nahin kamin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
उपवर ती कांता जाहली असे जाण । गोर्‍याची वासना नाहीं कामीं ॥१॥ विठोबाची आण घालोनि निरविलें । उभयतां ते वहिलें पाळा तुम्ही ॥२॥ सांगूनियां बध्द आपुल्या ग्रामा गेला । पुढें काय विचार जाहला परियेसा ॥३॥ एका जनार्दनीं सुखरुप तिघें । कामधाम वेगें करिताती ॥४॥