भजनी मालिका
← भजनांकडे परत

उपजले विटळीं मेले ते विटाळीं । राहिले विटाळीं ते ही जाती

upajale vitalin mele te vitalin | rahile vitalin te hi jati

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
उपजले विटळीं मेले ते विटाळीं । राहिले विटाळीं ते ही जाती ॥१॥ रडती पडती ते ही वेगें मरती । परि नाम न गाती भुली भ्रमें ॥२॥ कायरे हा देह सुखाचा तयासी । उघडाचि जासी अंतकाळी ॥३॥ चोखा म्हणे याचा न धरीं भरंवसा । अंती यम फांसा गळां पडे ॥४॥