भजनी मालिका
← भजनांकडे परत

उन्मनीचा हेलावा । तूर्या त्रिनयनीं दावावा । त्रिगुण तूर्या सांठवावा । तें कारण उन्मनीं

unmanicha helava | turya trinayanin davava | trigun turya santhavava | ten karan unmanin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
उन्मनीचा हेलावा । तूर्या त्रिनयनीं दावावा । त्रिगुण तूर्या सांठवावा । तें कारण उन्मनीं ॥१॥ हातीं देऊनी बावन कस । भुमंडळईं फिरवा भलत्यास । नाहें लांछन हीनकसास । बाळकांस तेंवें तें ॥२॥ एका जनार्दनीं हा बोध । उघड बोलिलों सुबोध । अनुभवोनि हा बोध । संतचरण धरावे ॥३॥