भजनी मालिका
← भजनांकडे परत

उन्मनी संयोगें गोसावी विराजे

unmani sanyogen gosavi viraje

उन्मनी संयोगें गोसावी विराजे । चहूं देहाचें ओझें निवारोनी ॥१॥ सोहमस्मीचे छंदे परिपूर्ण । विज्ञान हे खुण जेथें नाहीं ॥२॥ चंद्रसूर्याहुनी तेज तें आगळें । अव्यक्तें व्यापिलें अनुभवें ॥३॥ अनुभवाची खुण गुरुगम्य जाणती । ज्ञानदेवें विनंति हेचि केली ॥४॥