भजनी मालिका
← भजनांकडे परत

उन्मनि अवस्था लागली निशाणी

unmani avastha lagali nishani

उन्मनि अवस्था लागली निशाणी । तन्मयता ध्यानीं मुनीजनां ॥१॥ मन तेथें नाहीं पहासी तें काई । सर्व हरि डोहीं बुडी दे कां ॥२॥ मनाची कल्पना देहाची भावना । शून्य ते वासना हरिमाजी ॥३॥ निवृत्ति म्हणे सर्व हरिपीक फ़ळलें । ज्ञानासी लाधलें हरि कृपा ॥४॥