भजनी मालिका
← भजनांकडे परत

उणें पुरें बोलिलों आधीं । तें आपुलिये बुध्दि सारिखें

unen puren bolilon adhin | ten apuliye budhdi sarikhen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
उणें पुरें बोलिलों आधीं । तें आपुलिये बुध्दि सारिखें ॥१॥ तुम्ही तो देवा कृपामूर्ती । सकळां आर्ती पुरवितां ॥२॥ पशुपक्षी सांभाळिले । स्मरतां नेले निजधामां ॥३॥ निळा म्हणे तुमच्या घरीं । वाढे थोरी दासांची ॥४॥