भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऊंचा उंचपणा नीचा नीचपणा । तें नाहीं कारण विठ्ठलभेटी

uncha unchapana nicha nichapana | ten nahin karan viththalabheti

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
ऊंचा उंचपणा नीचा नीचपणा । तें नाहीं कारण विठ्ठलभेटी ॥१॥ उंच नीच याती असो भलते जाती । विठ्ठल म्हणतां मुक्ती जड जीवां ॥२॥ उभारुनि बाह्मा कटीं कर उभा । एका जनार्दनीं शोभा विटेवरी ॥३॥