भजनी मालिका
← भजनांकडे परत

उंच पदीं ठाव । करा स्वीकारुनी भाव

unch padin thav | kara svikaruni bhav

रचनाकार: संत निळोबा · अभंग
उंच पदीं ठाव । करा स्वीकारुनी भाव ॥१॥ अवघी कृपा तयावरी । दासांविशी उदार हरी ॥२॥ न नमूनियां याती कुळ । करुं धांवता सांभाळ ॥३॥ निळा म्हणे हाचि धंदा । तुम्हां सर्वदा गोविंदा ॥४॥