भजनी मालिका
← भजनांकडे परत

उद्धवा स्वमुखें सांगे श्रीकृष्ण । संतसेवा जाण सर्वश्रेष्ठ

uddhava svamukhen sange shrikrushna | santaseva jan sarvashreshtha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
उद्धवा स्वमुखें सांगे श्रीकृष्ण । संतसेवा जाण सर्वश्रेष्ठ ॥१॥ हाची योग जाण उद्धवा स्वीकारी । आणिक न करी भरोवरी साधन उद्धवा ॥२॥ योगयाग तप वत कसवटी । न करी आन गोष्टीरे उद्धवा ॥३॥ कीर्तन भजन सर्वभावें करी । जाई संतद्वारी शरणागत रे उद्धवा ॥४॥ मनींचे निजगुज सांगितलें तुज । एका जनार्दनीं निज साधे रे उद्धवा ॥५॥