भजनी मालिका
← भजनांकडे परत

उदयीं उदय होतां कृपादृष्टी । स्वयें जगजेठी सेवा करी

udayin uday hotan krupadrushti | svayen jagajethi seva kari

रचनाकार: संत निळोबा · अभंग
उदयीं उदय होतां कृपादृष्टी । स्वयें जगजेठी सेवा करी ॥१॥ सडा समार्जन स्वयें करी हरि । उदक तें भरी गंध घासी ॥२॥ स्वार्थ परमार्थ दोन्ही ही साधन । साधियेलें जाण क्षणमात्रें ॥३॥ करोनि कवित्व एकादशी टीका । भागवत देखा हरिलीला ॥४॥ निळा म्हणे अपार करोनि अभंग । तोडीला उव्देग संसाराचा ॥५॥