भजनी मालिका
← भजनांकडे परत

उदार संत उदार संत । जया तैसा हेत पुरविती

udar sant udar sant | jaya taisa het puraviti

रचनाकार: संत निळोबा · अभंग
उदार संत उदार संत । जया तैसा हेत पुरविती ॥१॥ अपार देणें अपार देणें । पावती पेणें वैकुंठीचें ॥२॥ न सरे ऐसें न सरे ऐसें । देती सहवासे निजात्मसुख ॥३॥ निळा म्हणे यांचिये पायीं । निज वस्ती देंई देवा मज ॥४॥