भजनी मालिका
← भजनांकडे परत

उदार देव उदार देव । नाशी भेव भक्तांचें

udar dev udar dev | nashi bhev bhaktanchen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
उदार देव उदार देव । नाशी भेव भक्तांचें ॥१॥ प्रल्हादाचे निवारी घात । राहिला जळता अग्नीसी ॥२॥ पांडवांचें करी काम । निवारी दुर्गम स्वअंगें ॥३॥ गौळियांचीं गुरें राखी । आपण शेखीं एकला ॥४॥ येतां शरण एकपणें । एका जनार्दनीं ऐसें देणें ॥५॥