भजनी मालिका
← भजनांकडे परत

उदंडाचें धांवणे केलें । तुम्हीं तें ऐकिलें पुराणीं

udandachen dhanvane kelen | tumhin ten aikilen puranin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
उदंडाचें धांवणे केलें । तुम्हीं तें ऐकिलें पुराणीं ॥१॥ म्हणोनियां विश्वास झाला । संतींही सांगितला बहुतांपरि ॥२॥ माझेंहि मज हिताचि वाटे । करितां गोमटें कीर्तन ॥३॥ निळा म्हणे न सोडीं पाय । होईल काय हो तें सुखें ॥४॥