भजनी मालिका
← भजनांकडे परत

उदंड भक्त भाग्यवंत देखिले । परी निधान दाविलें पुंडलिकें

udand bhakta bhagyavant dekhile | pari nidhan davilen pundaliken

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
उदंड भक्त भाग्यवंत देखिले । परी निधान दाविलें पुंडलिकें ॥१॥ धन्य धन्य केला जगाचा उद्धार । नाहीं लहानथोर निवडिले ॥२॥ एका जनार्दनीं दावियेला तारु । सुखाचा सागरु विठ्ठल देव ॥३॥