भजनी मालिका
← भजनांकडे परत

उचित अनुचित आम्ही नेणों नेणतीं । सर्वोविशीं मूढचि मती विदीत असावें

uchit anuchit amhi nenon nenatin | sarvovishin mudhachi mati vidit asaven

रचनाकार: संत निळोबा · अभंग
उचित अनुचित आम्ही नेणों नेणतीं । सर्वोविशीं मूढचि मती विदीत असावें ॥१॥ म्हणोनियां आतां कृपादृष्टी अवलोका । वैकुंठनायका नका उपेक्षा करुं ॥२॥ हीन दीन मूर्ख परि शरण तुम्हासी । आलो हषिकेशी अंगिकारावा ॥३॥ निळा म्हणे तुम्ही देवा कृपा सागर । मी तंव किंकर लवण रेणू सानसा ॥४॥