भजनी मालिका
← भजनांकडे परत

उभयतांचे समाधान राजाईनें केलें । माझें तों घडलें उत्तम कार्य

ubhayatanche samadhan rajainen kelen | majhen ton ghadalen uttam karya

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
उभयतांचे समाधान राजाईनें केलें । माझें तों घडलें उत्तम कार्य ॥१॥ मानसी तुम्ही नका करुं दु:ख । विठ्ठलाचें सुख मज जाहलें ॥२॥ एका जनार्दनीं राजाईची वाणी । ऐकतांच मनीं संतोषले ॥३॥