भजनी मालिका
← भजनांकडे परत

उभारुनी बाह्मा सकळां आश्वासन । या रे अठरा वर्ण पंढरीसी

ubharuni bahma sakalan ashvasan | ya re athara varna pandharisi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
उभारुनी बाह्मा सकळां आश्वासन । या रे अठरा वर्ण पंढरीसी ॥१॥ दरुशनें एकामुक्ति जोडे फुका । साधनांचा धोका करुं नका ॥२॥ माया मोह आशा टाकुनि परती । चरणीं चित्तवृत्ति जडों द्यावी ॥३॥ एका जनार्दनीं सांगे लहान थोरां । पंढरीस बरा कृपाळु तो ॥४॥