भजनी मालिका
← भजनांकडे परत

उभारिला ध्वज तिहीं लोकांवरी । ऐशी चराचरी कीर्ति ज्याची

ubharila dhvaj tihin lokanvari | aishi charachari kirti jyachi

रचनाकार: संत निळोबा · अभंग
उभारिला ध्वज तिहीं लोकांवरी । ऐशी चराचरी कीर्ति ज्याची ॥१॥ ते हे निवृत्तिनाथ ज्ञानेश्वर सोपान । मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा ॥२॥ धरुनि सगुण रुपें केली क्रीडा । बोलविला रेडा निगम वावे ॥३॥ बैसूनियां वरी चालविली भिंती । चांगदेवा प्रती दिली भेटी ॥४॥ मग वास केला अळंकापुरासी । पिंपळ व्दारासी कनकाचा ॥५॥ निळा म्हणे ज्याच्या नामें करितां घोष । नातळती दोष कळिकाळाचे ॥६॥