भजनी मालिका
← भजनांकडे परत

उभा विटेवरी । कट धरुनिया करीं । भीमा ती सामोरी । वहात आहे

ubha vitevari | kat dharuniya karin | bhima ti samori | vahat ahe

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
उभा विटेवरी । कट धरुनिया करीं । भीमा ती सामोरी । वहात आहे ॥१॥ जाऊं तया ठाया । आनंद तेणे काया । वैष्णवांचिया पायां ॥ लोटागंणी ॥२॥ कर्मोकर्म नाहीं वाद । भेदभ्रम नाहीं भेद । वैष्णवंचा छंद । नाम गाती आनंदे ॥३॥ सुख अनुपम्य अभेदें । एका जनार्दनीं छंदे । गातां नाचतां आल्हादें । प्रेम जोडे ॥४॥