भजनी मालिका
← भजनांकडे परत

उभा ठेला इटेवरीं । प्रभा दाटली अंबरीं

ubha thela itevarin | prabha datali ambarin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
उभा ठेला इटेवरीं । प्रभा दाटली अंबरीं ॥१॥ विठो कैवल्याचा गाभा । व्यापुनियां ठेला नभा ॥२॥ नेणती कुसरी । ब्रम्हादिक ज्याची थोरी ॥३॥ निळा म्हणे भक्तिसुखा । भुलोनियां आला देखा ॥४॥