भजनी मालिका
← भजनांकडे परत

उभा चंद्रभागे तीरीं । कट धरुनियां करीं

ubha chandrabhage tirin | kat dharuniyan karin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
उभा चंद्रभागे तीरीं । कट धरुनियां करीं ॥१॥ रुप सावळें सुंदर । कानीं कुंडलें मकराकर ॥२॥ तुळसेमाळा शोभे कंठीं । अंगी चंदनाची उटी ॥३॥ भक्त आनंदें गर्जती । विठ्ठल विठठल उच्चरिती ॥४॥ एका जनार्दनी ध्यान । शोभे सगुण निर्गुण ॥५॥