भजनी मालिका
← भजनांकडे परत

उभा भीमातीईं कट धरुनी करीं । वैकुंठीचा हई मौनरुप

ubha bhimatiin kat dharuni karin | vaikunthicha hai maunarup

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
उभा भीमातीईं कट धरुनी करीं । वैकुंठीचा हई मौनरुप ॥१॥ ठेविनिया विटेसम पद दोन्हीं । उभा चक्रपाणी मौनरुपें ॥२॥ वैजयंती माळ किरीट कुंडलें । निढळ शोभलें केशरानें ॥३॥ कांसे पीतांबर दिसे सोनसळा । पदक आणि माळा कौस्तुभ ते ॥४॥ चरणींचा तोडर एका जनार्दन । करीत स्तवन भक्तिभावें ॥५॥