भजनी मालिका
← भजनांकडे परत

त्यांचिया इच्छेसारखें करावें । त्यांच्या मागें जावे वनांतरीं

tyanchiya ichchhesarakhen karaven | tyanchya magen jave vanantarin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
त्यांचिया इच्छेसारखें करावें । त्यांच्या मागें जावे वनांतरीं ॥१॥ वनासी जाऊनी नानापरी खेळे । हमामे हुतुतु बळें गडी घेती ॥२॥ सर्वांघडी संतां सर्वावरिष्ट देव । तयावरी डाव गाडी घेती ॥३॥ अंगावरी डाव आला म्हणती गोपाळ । देई डाव सकळ आमुचा आम्हां ॥४॥ पाठीवरी बैसती देवतें म्हणती । वांकरे श्रीपति वेंगीं आतां ॥५॥ एका जनार्दनी गडियांचे मेळीं । खेळें वनमाळी मागें पुढें ॥६॥