भजनी मालिका
← भजनांकडे परत

त्यागूनियां स्त्री संन्यासी जे होती । पतना ते जाती अंतकाळीं

tyaguniyan stri sannyasi je hoti | patana te jati antakalin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
त्यागूनियां स्त्री संन्यासी जे होती । पतना ते जाती अंतकाळीं ॥१॥ घेउनी संन्यास ध्यान पै स्त्रियांचे । गुंतलासे आशे वायां जाये ॥२॥ नारायण नामीं नाहीं पैं आचार । सर्व अनाचार स्त्रीतें लक्षी ॥३॥ एका जनार्दनीं संन्यास लक्षण । गीतेमाजीं कृष्ण बोलियेला ॥४॥